Cute & Gorgeous Ayli Ghiya Making Her First Debut in 35% Kathavar Pass

Ayli Ghiya
Ayli Ghiya in 35% Kathavar Pass :-

Gorgeous Ayli Ghiya making her debut opposite Prathamesh Parab in forthcoming Marathi movie 35% Katthavar Pass directed by Satish Motling.

Ayli is very sweet by nature and co-operative. Being from Pune, she speaks good Marathi and is a very good dancer. Ayli is studying in 12th standard. She had earlier worked in Bollywood movie Hunterrr. Ayli will play Nikita in 35% Katthavar Pass opposite Prathamesh Parab.

 

नई नवेली ‘आयली’ :-

जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी कामासाठी वा शिकण्यासाठी जातो तेव्हा तेथे सुरूवातीला आपण फार बुजल्यासारखे वावरत असतो. तिथल्या कामाची, माणसांची ओळख होईपर्यंत सगळे नवीन असते पण एकदा की वेवलेन्थ जुळली की मग आपण त्यांंच्यातलेच एक होऊन जातो.

असाच काहीसा अनुभव अागामी 35% काठावर पास या चित्रपटातील नायिका ‘आयली’ हिला येतोय. दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांच्या आगामी 35% काठावर पास या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीमधे धडाकेबाज एन्ट्री मारणाऱ्या आयली साठी, हे वातावरण अगदीच नवीन आहे. चित्रपटाचे सेट्स, मेकअप, कॅमेरा या सगळ्या बाबी आयली साठी अत्यंत नवीन आहेत.

पण या सगळ्यात तिला गोंधळून न जाता कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत झालीये ती तिच्या सहकलाकारांची.

संजय नार्वेकर, प्रथमेश परब, भाग्यश्री संकपाळ यांच्या सारखी टीम असल्यावर आयली साठी चिंतेचे काही कारणच नव्हते. आपल्या सहकलाकारांविषयी बोलताना ती म्हणते की, “संजय सर, प्रथमेश यांच्यासोबत काम करताना खूप धमाल आली.

सुरूवातीला जरा घाबरायला व्हायचे, दडपण यायचे पण सगळ्यांनीच खूप समजून घेतलं. त्याचा ऑनस्क्रीन भूमिका वठवताना सुद्धा खूप फायदा झाला” आयली साठी हा चित्रपट एक अनुभवांची पोतडी सिद्ध होतोय.

त्याचा तिला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे मराठी चित्रसृष्टीतील या आगामी नायिकेला, म्हणजेच नव्या नवेल्या आयली ला 35% काठावर पास साठी शुभेच्छा…!
Related Links :-
Marathi Audience Excited to Watch 35% Kathavar Pass Trailer
Prathamesh Parab & Ayli Ghiya Hot Sexy Song “Moharle He” : MUST WATCH
Prathamesh Parab “35% katthavar Pass” Teaser Out: MarathiGossip
35% Katthavar Pass Actor, Actress, Cast, Crew Photo Collection
35% Kathavar Pass Actress Ayli Ghiya Biography & Hot Pics

You may also like...