35% Katthavar Pass Trailer Out : WATCH Now

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या सतीश मोतलिंग दिग्दर्शित आगामी 35% काठावर पास या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. एन.एस.सी.आय. वरळी येथे पार पडललेल्या या पत्रकार परिषदेमधे 35% काठावर पास च्या संपूर्ण टीम च्या हस्ते या चित्रपटाच्या पहिल्यावहिल्या ट्रेलरचे लॉंचिंग करण्यात आले.

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश मोतलिंग, निर्माते सेजल शिंदे तसेच अमित भानुशाली उपस्थीत होते. या चित्रपटामधे प्रथमेश परब हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे त्याचप्रमाणे ‘आयली’ च्या निमित्ताने एक नवोदित अभिनेत्री मराठी चित्रसृष्टीत दाखल होतेय. चित्रपटातील प्रमुख भूमिकांसोबतच संजय नार्वेकर, सुशांत शेलार, भाग्यश्री संकपाळ हे चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. आपल्या संगीताने मराठी मनांना मंत्रमुग्ध करणाऱ्या समीर सप्तिसकर यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे.

शाळकरी तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारी टक्क्यांची स्पर्धा,त्यातील यशापयशाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यांवर अत्यंत मार्मिक आणि विनोदी पद्धतीने भाष्य या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विषय गंभीर असला तरीही त्याला विनोदाची झालर असल्याने तोच विषय हलक्याफुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येईल असे मत चित्रपटाच्या निर्मात्या सेजल शिंदे यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेप्रसंगी ‘35% काठावर पास’ या चित्रपटाशी निगडीत यशमोहन आपटे,माधवी जुवेकर,विजय पाटकर, भारत गणेशपुरे, जयेश चव्हाण,चैतन्य आडकर, पंकज पडघन आदी कलाकार उपस्थीत होते.

मराठी चित्रपटसृष्टीत यानिमित्ताने विविध विषय हाताळण्याची जणू स्पर्धा लागली आहे त्यातूनच मराठी चित्रपटांमधील गुणवत्ता ही एकेका टक्क्याने वाढतेच आहे. आगामी 35% काठावर पास हा त्यातलाच एक महत्वाचा टक्का ठरणार यात शंका नाही कारण यू ट्यूब आणि सोशल मिडियामधे रिलीज केल्या गेलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर झपाट्याने व्हायरल होतो आहे त्यामुळे ह्या चित्रपटाकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा निश्चितच खऱ्या उतरतील अशी आशा आहे…!

Presenting Theatrical Trailer ‘35% Katthavar Pass’ Marathi Movie directed and produced by Satish Motling, Starring Prathamesh Parab, Ayali Ghiya, Bhagyashree Shankapal, Yashoman Apte, Sanjay Narvekar, Madhavi Juvekar, Sushant Shelar, Neha Pendse.
35% Katthavar Pass Trailer:-
Related Links:-
Marathi Audience Excited to Watch 35% Kathavar Pass Trailer
Prathamesh Parab & Ayli Ghiya Hot Sexy Song “Moharle He” : MUST WATCH
Prathamesh Parab “35% katthavar Pass” Teaser Out: MarathiGossip
35% Katthavar Pass Actor, Actress, Cast, Crew Photo Collection
35% Kathavar Pass Actress Ayli Ghiya Biography & Hot PicsYou may also like...